१.शिवाजी महाराज संग्रहालय सुरु असण्याची वेळ काय आहे?
सोमवार ते रविवार सकाळी ०९:३० ते संध्याकाळी ६:३० पर्यंत
२.संग्रहालयात प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क आहे का?
होय, शिवसृष्टीसाठी प्रवेश शुल्क आहे. प्रौढांसाठी ६०० रुपये आहे, १६ वर्षाखालील मुलांसाठी ३०० रुपये शुल्क आहे.
३. मी संग्रहालयासाठी तिकिटे कशी आरक्षित करू शकतो?
तुम्ही BookMyShow वर किंवा थेट संग्रहालयात तिकीट केंद्रावरून तिकीट बुक करू शकता.
४. दिव्यांगांसाठी संग्रहालय प्रवेश योग्य आहे का?
शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींच्या विनंतीनुसार व्हीलचेअर उपलब्ध आहे.
५.ऑडिओ मार्गदर्शक किंवा टूर उपलब्ध आहेत का?
मराठी आणि हिंदीत समजावून सांगणारा मार्गदर्शक संग्रहालयात उपब्लध आहे.
६. संग्रहालयात छायाचित्र काढण्यास परवानगी आहे का?
गॅलरी आणि शोमध्ये छायाचित्रे काढण्यास परवानगी नाही परंतु तुम्ही आवारात छायाचित्रे काढू शकता.
७. संग्रहालयात अन्न आणि पेय पिण्यासाठी परवानगी आहे का?
संग्रहालयात खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थांना परवानगी नाही.प्रशासकीय इमारतीत छोट्या स्वरूपातील स्नॅक्स कॅफेटेरिया उपलब्ध आहे.
८.मी माझी बॅकपॅक किंवा सामान संग्रहालयात आणू शकतो का?
नाही.
९. मी सार्वजनिक वाहतूक वापरून संग्रहालयात कसे जाऊ शकतो?
तुम्ही स्वारगेट ते आंबेगाव किंवा डेक्कन ते आंबेगाव अशी PMPL बस घेऊ शकता. कात्रजहून वाकडच्या दिशेने जाणा-या कोणत्याही सार्वजनिक वाहनाने तुम्ही शिवसृष्टीच्या अगदी समोर उतरू शकता.
१०.अभ्यागतांना त्यांचे सामान ठेवण्यासाठी क्लोकरूम किंवा स्टोरेज एरिया आहे का?
सध्या आमच्याकडे स्टोरेज किंवा क्लोकरूमची सुविधा नाही.