"रणांगण : युद्धक्षेत्र"
शिवसृष्टी संग्रहालय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संधी देत आहे. रणांगण या दालनात 17 व्या शतकातील मूळ चित्रांच्या प्रतिकृती पाहायला मिळणार असून यामध्ये शिवाजी महाराजांच्या शत्रूंचे चित्रण आहे. ही चित्रे हेग म्युझियम, नेदरलँड्स आणि बिब्लिओथिक फ्रान्समधील विट्सन अल्बममध्ये प्रदर्शित केलेल्या मूळ संग्रहांची अस्सल पुनरुत्पादने आहेत. इटालियन प्रवासी आणि इतिहासकार निकोलो मनुची हा यातील काही घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार राहिलेला होता.
रणांगण हे दालन तुम्हाला या सर्व चित्रांचे तपशील पाहण्याची दुर्मिळ संधी देत आहे. आपणाला हा चित्रांमधून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ आणि त्या काळातील राजकीय आणि सामाजिक वास्तव कशा स्वरूपाचे होते याचे प्रतिबिंब पाहायला मिळते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याला भारतीय इतिहासात अनन्यसाधारण आणि महत्त्वाचे स्थान का आहे हे समजून घेण्यासाठी या आणि शिवसृष्टी येथील रणांगण दालनाला अवश्य भेट द्या.