देणगी

शिवसृष्टि    03-Apr-2023
Total Views |
आई भवानीमातेचा शुभाशीर्वाद, राजा श्री शिवछत्रपतींच्या चरणी मानाची वंदना करुन, राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानने पुण्यातील आंबेगांव, इथे शिवसृष्टी उभारली आहे.शिवरायाच्या शौर्याचे प्रतीक असलेले गडकिल्ले, स्वराज्याची धुरा वाहताना महाराजांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग आदी अनेक गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभारण्यात आल्या आहेत. आशिया खंडातील अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन उभारण्यात आलेला हा ऐतिहासिक प्रकल्प आहे. तुमच्यासारखे सामाजिक जाण असणारे शिवकालीन इतिहासाचा अभिमान बाळगणारे मावळे आहेत म्हणूनच ऐतहासिक घटकांशी असलेली बांधिलकी आपण जपली आहे आणि म्हणूनच आपली संस्कृती गेल्या शेकडो वर्षांपासून टिकून आहे. अजूनही या प्रकल्पाचे तीन टप्पे बाकी असून यासाठी आपल्या आर्थिक मदतीची गरज आहे.

चला तर मग आपण शिवसृष्टीच्या उभारणीसाठी आपला हातभार लावू या !
खालील लिंकद्वारे आपण ऐच्छिक रक्कम देवू शकता.

चला टाकूया पाऊल पुढच्या पिढीला इतिहासाची साक्ष देवू या
शिवसृष्टीचे निर्माण करण्या आपली ओंजळ रिती करू या !!