छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणाऱ्या आहेत.बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमा कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेच यांनी इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. यापैकीच एक घटना म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका.12 मे रोजी त्यांची औरंगजेबाशी भेट ठरवण्यात आली.
दरबारात 'शिवाजी राजा' असे शब्द पुकारण्यात आल्यावर, कुमार रामसिंहांनी शिवाजी महाराज, युवराज संभाजी राजे आणि दहा सेवकांना घेऊन दिवाण-ए-आममध्ये औरंगजेबासमोर आणले.महाराजांना तिस-या रांगेत उभं करून त्यांचा अपमान करण्यात आला आणि त्यानंतर त्यांना कैदेत ठेवण्यात आलं. आग्र्याहून सुटका हा फक्त शिवसृष्टीइथला देखावा नाही तर एक संपूर्ण अनुभव आहे जो पाहताना आपण इतिहासाचा भाग असल्यासारखे वाटेल.
आग्र्याचे वातावरण आणि घटना पुन्हा निर्माण करणारे दृकश्राव्य प्रभाव पाहून तुम्ही थक्क व्हाल. तुम्ही या सुटकेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ आणि भारतीय इतिहासाचा मार्ग कसा बदलला याबद्दलदेखील शिकू शकाल. लहानपणी शाळेत असताना आग्र्याहून सुटका पुस्तकात वाचली होती पण आज ती ऐतिहासिक सुटका अनुभवता येणार आहे. आग्र्याहून सुटका ही शिवाजी महाराजांच्या साहस आणि बुद्धिमत्तेला आणि भारतीय इतिहास आणि संस्कृतीतील त्यांच्या योगदानाला मानाचा मुजरा आहे. महाराजांनी छोट्या शंभू बरोबर कशी सुटका करून घेतली त्याचा थरार पाहायचा असेल तर तो इथेच या शिवसृष्टीत.