समकालीन समाजाची ओळख नेहमी भूतकाळाशी जोडलेली असते. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानने मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना मराठा इतिहास आणि अर्थपूर्ण संस्कृतीला जगासमोर आणण्यास स्वतःला झोकून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि इतिहास याविषयीचे ज्ञान समाजातील सर्व स्तरांमध्ये जतन करणे, त्यांचा प्रचार करणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे.
आपण आपल्या भूतकाळातील घटनांचा वर्तमान आणि भविष्यात कसा उपयोग होईल ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या जनमानसाला , आपल्या प्रदेशाला आणि जगाला पुढील वारसा देताना तो चांगल्या स्थितीत देण्याची प्रत्येक पिढीची मूलभूत जबाबदारी आणि तत्वे प्रतिबिंबित होत असतात. पूर्वीच्या काळातील शिक्षण, चागल्या गोष्टींचे समर्थन आणि संस्कृतीची जोपासना या माध्यमातून समृद्ध मराठा वारसा भावी पिढ्यांपर्यंत शाश्वत आणि संवादी मार्गाने पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे.