रायगडाची 3D (त्रिमितीय) हवाई सफारी
रायगडची थ्री डी हवाई सफारी: द शो ऑफ अ लाइफटाइम
शिवसृष्टी संग्रहालयामध्ये रायगडाचा अतिशय नेत्रदीपक देखावा पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मराठा साम्राज्याची राजधानी रायगडच्या थ्री डी हवाई सफारीवर जाण्याची संधी या निमित्ताने मिळत आहे. रायगडची थ्री डी हवाई सफारी एक दृश्य स्वरूप असून ; प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
रायगड किल्ला सह्याद्री पर्वत रांगेत असून हा किल्ला पाया सपाटीपासून ८२० मीटर (२,७०० फूट) आणि समुद्रसपाटीपासून १,३५६ मीटर (४,४४९ फूट) उंच आहे. याच ठिकाणी १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला आणि १६८० मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
या ठिकाणी किल्ला आणि त्याच्या सभोवतालचे थ्री डी हवाई दृश्य पाहायला मिळत आहे. हा किल्ला म्हणजे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण असून एखाद्या पक्षाप्रमाणे किल्ल्यावरून आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवता येत असे. भव्य महादरवाजा, किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, जगदीश्वर मंदिर,छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि गंगासागर तलाव, महाराजांनी तयार केलेला कृत्रिम तलाव आदी गोष्टी या थ्री डी हवाई सफारीद्वारे पाहायला मिळत आहे. याबरोबरच इतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या साम्राज्याचा गौरव करणाऱ्या अनेक वास्तू आणि स्मारके याद्वारे पाहायला मिळत आहेत.
शिवसृष्टी संग्रहालयात रायगडची थ्री डी हवाई सफारी पाहण्याची आणि जुन्या काळातील रोमांच आणि वैभव अनुभवण्याची ही संधी गमावू नका.