किल्ला बांधणी प्रशिक्षण वर्ग

20 Oct 2023 15:18:50

English    हिंदी


fort-marathi 

स्वराज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे पुरेपूर जाणले होते कि गडकोट, किल्ले, दुर्ग आणि मावळे हे स्वराज्याचे खरे आधारस्तंभ आहेत. आजच्या काळात हे गडकोट आणि किल्ले ही संघर्षाची प्रतिके राहिली आहेत. या गड – किल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजायचा असेल तर त्यांना प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी काळी – तांबडी माती, चिखल त्यांच्या हाताला लागली पाहिजे. या उद्देशाने शिवसृष्टीने आयोजित केलेल्या “किल्ले बांधणी स्पर्धेच्या प्रशिक्षण” सत्रात आपण सहभागी व्हावे असे आपणास नम्र आवाहन.


  • सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला फॉर्म भरून पाठवावा : https://bit.ly/TrainingForts
  • नाव नोंदणीची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2023
  • प्रशिक्षणाची तारीख : 29 ऑक्टोबर 2023 व 05 नोव्हेंबर 2023
  • प्रशिक्षणाची भाषा : मराठी, हिंदी इंग्रजी मध्ये
  • अधिक माहिती सपंर्क करा : 9730604113 ( संपर्काची वेळ सकाळी 10 ते दुपारी 05 पर्यंत)

Powered By Sangraha 9.0